Sunday, July 11, 2010

Stotra

Shree Aniruddha Gurushekrtam Mantra




प्रत्येक सदगुरू भक्ताला वाटत असते की आपल्या गुरूने आपल्याला कानमंत्र म्हणजेच गुरुमंत्र दयावा. पण प.प. पूज्य बापूंनी परमात्म्याच्या प्रत्येक भक्तासाठी एक महन मंगल असा मंत्र जाहीर केला. तो म्हणजे गुरुक्षेत्र मंत्र .

हा मंत्र प्रत्येकासाठी गुरुमंत्रच आहे .त्याचा स्वीकार करावा की नाही ह्याचे स्वातन्त्र प्रत्येकाला आहे.


गुरुक्षेत्र मंत्राचे महत्व :

गुरुवार दिनांक १ एप्रिल २०१० रोजी प.प.पूज्य बापूंनी ह्या मंत्राची महती सांगीतली. बापू म्हणाले "हा मंत्र मी स्वत: सिद्ध केला आहे , असा मंत्र आजपर्यंत झाला नाही आणि ह्यापुढेही होणार नाही .


ह्या मंत्राच्या तीन रचना / अवस्था आहेत .

१) गुरुक्षेत्र बीजमंत्र ( बीजा अवस्था )

२) गुरुक्षेत्र अंकुर मंत्र ( बीजाची वृक्ष बनण्याची अवस्था )

३) गुरुक्षेत्र उन्मीलन मंत्र (कळीचे फुल - फुलाचे फळ - फळापासून बीज होण्याची क्रिया

हा पुढच्या काळासाठी तारक मंत्र आहे. ह्या मंत्राचे चिंतन करत मनन करायच आहे . ह्या मंत्राच्या पलीकडे कुठलाही मंत्र जाऊ शकत नाही. हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हा मंत्र सर्वांच्या खुणा पटविणार आहे

बीज - अंकुर - उन्मीलन ह्या तीनही अवस्था ॐ श्री दत्तगुरवे नमः ह्या महन मंगल महामंत्राने जोडल्या गेल्या आहेत .

उगम आणि सिद्धी :

हा मंत्र ज्या दिवशी सर्व भक्तांसाठी सिद्ध झाला तो दिवस सर्व भक्तांसाठी अतिशय मंगल आणि पवित्र होता. हा दिवस म्हणजेच ,


चैत्र पौर्णिमा

हनुमान जयंती

श्री त्रिविक्रम ची स्थापना षोडोपचार

अश्या ह्या महापवित्र दिवशी प.प. पूज्य बापूंनी आपल्या भक्तांसा ठी हा गुरुक्षेत्र मंत्र खुला केला. प.प. पूज्य बापू म्हणाले, " हा पवित्र मंत्र कोणत्याही देवी - देवतेचे पूजन करते वेळी घेता येतो .( जर त्या देवतेचा मंत्र माहित नसेल तर सोळा वेळा ह्या गुरु मंत्राचे पठण केल्यास त्या देवतेच्या षोडशोपचार पूजनाचे फळ प्राप्त होते.) ह्या मंत्राने केलेले पूजन हे परीपूर्ण होतेच. हा मंत्र कधीही उच्चारता येईल .

आम्ही आमच्या जीवनात नेहमी देवाचे बोन्साय करत असतो व त्यामुळे देवा वरच्या विश्वासाचे ही बोन्साय करतो. परिणामी मग आमच्या जीवनाचेही बोन्सायच होते .

गुरुपरंपरेच्या आज्ञेने हा गुरुक्षेत्रम मंत्र स्वतः बापूनी सिद्ध केला आहे. कोणासाठी ? तर बापूंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक श्रद्धावान मित्रांसाठी.

आदिमातेचे त्रिधा स्वरूप , काळाचे भूत- वर्तमान-भविष्य हे त्रिविध स्वरूप , जीवनाच्या बाल- तारुण्य-वार्धक्य ह्या तीनही अवस्था सर्व काही ह्या तीन मंत्रानी बनलेल्या गुरूक्षेत्रम मंत्रा मधेच आहेत.

ज्यांना हा मंत्र गुरुमंत्र म्हणून स्वीकारायचा आहे, त्यांनी आज रात्री झोपायच्या आधी किंवा उद्या रात्री किंवा १ महिन्यानंतर रात्री किंवा १ वर्षानंतर रात्री किंवा कधीही रात्री झोपायच्या आधी शांत बसून हात जोडून म्हणा , " हे अनिरुद्धा, ( हे बापुराया ) आजपासून हा मंत्र माझा झाला ( मी स्वीकारला ) .

बापू पुढे हेही म्हणाले की , " तुम्ही जेव्हा हा मंत्र स्वीकारत असाल त्या क्षणी मी तिथे हजर असेन. "



हरी ॐ

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम..विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र









श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम म्हणजे पापांची निवृती करणारं, पापाबद्दल क्षमा करणारं, पुण्याची वृद्धी करणारं, परमात्म्याची प्राप्ती करुन देणारे, गुरुचरणी भाव वाढविणार आणि मला पुरुषार्थी बनविणारं विश्वातील एकमेव अद्वितीय तीर्थक्षेत्र.




श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम असे तीर्थक्षेत्र आहे की जेथे श्रद्धावान आहे, त्या प्रत्येक श्रद्धावानाच्या ठिकाणी, त्याच्या आजुबाजूला ह्या अनिरुद्ध गुरुक्षेत्रमचा प्रभाव आहे, अगदी प्रलयापर्यंत.



श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम विश्वातील एकमेव अद्वितीय तीर्थक्षेत्र का?



१) श्री अनिरुद्धांचे पंचगुरु म्हणजेच श्री दत्तगुरु, श्री गायत्री माता, श्रीराम, हनुमंत व साईनाथ ह्यांचे निवासस्थान आहे ते याच तीर्थक्षेत्री.



२) गायत्री मातेने नवअंकूर ऎश्वर्य प्रदान करुन सिद्ध केलेले प्रणव स्वरुप प. पू. श्री अनिरुद्ध बापू, प. पू. श्री नंदाई व प. पू. सुचितदादा यांचे प्रत्यक्ष वास्तव्य याच तीर्थक्षेत्री असून त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा व चरणमुद्रांच्या दर्शनाचा लाभ भक्तास होतो तो याच तीर्थक्षेत्री.



३) "मी तुला कधीच टाकणार नाही" या सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपावचनामुळे प्रत्येक भक्ताचा अनिरुद्ध चरणांशी श्रद्धायुक्त गुरुभाव दृढ होतो, तो याच तीर्थक्षेत्री.



४) अकारण कारुण्य, क्षमा व माझ्या अनन्य भक्तीची स्विकृती करून माझ्या परिश्रमाला, कुवतीला व क्षमतेला सातत्याने बल, भक्ती आदी ९ ऎश्वर्य पुरविणारे, माझ्या हक्कचे व प्रेमाचे स्थान म्हणजेच धर्मासन अर्थात धर्माचे आसन व पावित्र्याचे अधिष्ठान असलेला साक्षात माझा बापू श्री अनिरुद्ध, त्याच्या धर्मासनाचे दर्शन होते. तेही याच तीर्थक्षेत्रात.



५) नित्य आरती, जप, उपासना, विष्णू सहस्त्र नाम इत्यादी भावपूर्ण दैनंदिन कार्यक्रमाबरोबर "श्रीरामरसायन", "मातृवात्सल्यविंदानम" या ग्रंथांच्या नित्य पठ्णामुळे माझ्यातील भक्तीभाव सहज प्रकट होऊन भाववृद्धी होते ती याच तीर्थक्षेत्री.



६) सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या संकल्प शक्तीतून प्रकटलेल्या एकमेव अद्वितीय अशी "त्रिविक्रमाचे" प्रत्यक्ष दर्शन घडते ते याच तीर्थक्षेत्रात.



७) प्रणवस्वरुप श्री अनिरुद्धांच्या प्रेमाच अखंड स्त्रोत त्यांच्य सगुण साकार रुपामुळे मला प्राप्त होतो तो याच तीर्थक्षेत्रात.



८) ज्याचा मुळ गुणधर्म श्रद्धावानांना क्षमा करणे आहे. त्या श्रीमद पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्राचे प्रत्यक्ष दर्शन होते ते ही याच गुरुक्षेत्रात.



९) आदीमाता गायत्री, तिच्या महिषासुरमर्दीनी अशा सुक्ष्म रुपात प्रकटली आहे ती याच तीर्थक्षेत्रात. त्या महिषासुरमर्दीनीचे व "घंटा" रुपात असलेल्या तिच्या अस्त्राचे दर्शन होते ते याच गुरुक्षेत्रात.



१०) पृथ्वीला धारण करणारे काळ्यापाठीचे कूर्म श्रद्धावानांना विश्वात कुठेही गेलात तरी गुरुक्षेत्रम्शी कायम जोडून ठेवणारे आहे. त्या काळ्यापाठीच्या कूर्माचे दर्शन होते. ते ही याच तीर्थक्षेत्रात.



ज्याक्षणी मी माझं नातं गुरुक्षेत्रमशी दृढ करतो, त्या क्षणी मला सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपाप्रसादाच सहज लाभ प्राप्त होतोच. तसेच जेव्हा मी गुरुक्षेत्रमला वारंवार येत राहतो. तेव्हा मला सर्व १०८ तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्यही मिळतेच व त्याचबरोबर माझ्या पापांचे/चुकांचे क्षालन होते. म्हणून माझ्यावर नित्य कृपा करणार्या प्रणव स्वरुप श्री अनिरुद्धानां प्रार्थना करुया की....



"हे सद्गुरुराया, तू माझा आधारस्तंभ आहेस, वात्सल्यपिता आहेस आणि रक्षक बंधू म्हणून माझे कवच ही आहे। म्हणून हे देवाधिदेवा अनिरुद्ध, तू माझे अद्न्यान दुर करून माझा पुरुषार्थ सिद्ध कर, माझ्या जीवनाचे गोकुळ कर, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. तू माझ्यासाठी केलेला प्रत्येक संकल्प माझ्या उद्धारासाठीच आहे म्हणून हे गुरुराया तुझ्या चरणांजवळ राहून मी विनम्रपणे तुझ्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेत आहे."





"मी विनम्रपणे तुझ्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेत आहे."

Anniruddha's Institute of Yoga