aniruddhasfriends

Pages

  • Home
  • Manasamarthyadata Anubhav
  • General Knowledge
  • Informative
  • Thursday Discourse

Monday, November 19, 2012

AADM Seva at National Park, Borivali, Mumbai for Anant Chaturdashi dated 29/09/12.

AADM News & Events by AADM website -           





Posted by Unknown at 6:18 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)
मित्रांचा मित्र,अनिरुद्ध



परमपूज्य अनिरुद्ध बापू (डॉक्टर

अनिरुद्ध धै. जोशी) ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये

५ नोव्हेंबर, २००६ (अनिरुद्ध पौर्णिमा)

रोजी प्रकाशित झालेला

अग्रलेख. डॉ.अनिरुद्ध धै. जोशी.

जन्म :त्रिपुरारि पौर्णिमा,

१८ नोव्हेंबर १९५६ पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.

माता : सौ. अरुंधती जोशी.

पिता : डाँ. धैर्यधर जोशी. संगोपन :

आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित.



(माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये) विशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये (बापूंच्या पणजी)

शालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत एस. एस. सी. - इ. स. १९७२ वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई (टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय) एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८ एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२ . मी असा आहे आणि मी तसा आहे - मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे? ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती. सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणि दुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे; ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही. प्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्टित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे. माझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो, बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मी' फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणि कधीही नसेल. ----------------------------------- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी (अग्रलेख : दै. 'प्रत्यक्ष' दि. ३० ऑगस्ट २००९)
: कुणीही 'आम्ही सदगुरुंचे लाडके आहोत, विश्वासू आहोत, श्रेष्ठ साधक आहोत' अश्या प्रकारे मिरवत असेल, तर प्रत्येक श्रद्धावानाला त्या व्यक्तीचे वर्तन पारखण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुणी कुठल्याही अधिकारपदावर असेल व स्वत:स श्रेष्ठ साधक समजत असेल, तरीही त्याच्याकडे पुढील गोष्टी असणे अत्यावश्यक आहे, हा माझा ठाम सिद्धांत आहे.
१) आह्निक दररोज दोन वेळा करणे.
२) आह्निक, रामरक्षा, सदगुरूगायत्री(अनिरुद्ध-गायत्री मंत्र), सदगुरुचलिसा(अनिरुद्धचलीसा), हनुमानचालीसा व दत्तबावनी तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यांतून कमीत कमी एक रामनाम वही पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.
३) बरोबरच्या व हाताखालच्या सहका-यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे. सहका-यांची किंवा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.
४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणा-या प्रत्येकाने 'आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे वर्तन करू नये.
५) बोलण्यापेक्षा, बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दॄष्टीने महत्वाचे आहे.
६) ह्या विश्वामध्ये कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करु शकत नाही' , असे म्हणू शकत नाही व असे कुणीही मानू नये.
७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.
८) चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे.
९) परपीडा कधीच करता कामा नये। माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण' ह्याच मूलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकडे नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. तुमच्या हातात मी आज 'मला काय आवडते व काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत.

मित्रांचा मित्र, अनिरुद्ध



Followers

Blog Archive

  • 11/18 - 11/25 (1)
  • 06/17 - 06/24 (1)
  • 02/26 - 03/04 (1)
  • 07/10 - 07/17 (1)
  • 06/12 - 06/19 (1)
  • 06/05 - 06/12 (1)
  • 05/08 - 05/15 (2)
  • 04/03 - 04/10 (2)
  • 03/27 - 04/03 (5)
  • 03/06 - 03/13 (1)
  • 02/20 - 02/27 (4)
  • 01/16 - 01/23 (1)
  • 01/02 - 01/09 (3)
  • 12/19 - 12/26 (1)
  • 11/14 - 11/21 (1)
  • 10/10 - 10/17 (1)
  • 09/26 - 10/03 (2)
  • 09/05 - 09/12 (1)
  • 08/15 - 08/22 (2)
  • 08/08 - 08/15 (2)
  • 08/01 - 08/08 (2)
  • 07/25 - 08/01 (2)
  • 07/18 - 07/25 (3)
  • 07/11 - 07/18 (4)
  • 07/04 - 07/11 (6)
  • 06/27 - 07/04 (2)
  • 06/06 - 06/13 (3)

About Me

Unknown
View my complete profile

Search This Blog

Locations of visitors to this page

Counter

Hit Counters
Hit Counter
Ethereal theme. Powered by Blogger.